

भंडारा, (Bhandara)२६ मे, : लाखनी वरून भंडारा कडे येत असलेल्या रक्त पेटी गाडीला अचानक भीषण आग लागल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील खुटसावरी फाटा येथे घडली.
या घटनेची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. मात्र, अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी पोहचत पर्यंत रक्त पेटी गाडी जळून खाक झाली होती. या गाडीला कशामुळे आग लागली हे अद्याही कळू शकले नाही.