
यवतमाळ – नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील कोसदनी महामार्ग चौकीतील पोलीस कर्मचारी कर्तव्य बजावत असताना रात्री दरम्यान नांदेड कडून यवतमाळकडे जाणाऱ्या ट्रकने पोलीस जिपला जोरदार धडक दिल्याने यात एका पोलीस कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. अन्य दोन जखमी झाल्याची घटना घडली. ट्रकचालक देखील जागीच ठार झाला असून जखमींवर शासकीय रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत.