नमो रोजगारमध्ये एकूण 49 हजार रिक्त जागा भरणार – देवेंद्र फडणवीस

0

 

(nagpur)नागपूर येथे आयोजित नमो महारोजगार मेळाव्याच्या माध्यमातून रोजगार देणारे व रोजगार घेणारे एका छताखाली आले आहेत. या उपक्रमात 60 हजार तरुणांची नोंदणी झाली असून मुलाखती घेऊन रोजगार देणाऱ्या एकूण 800 आस्थापना एकूण 49 हजार रिक्त जागा भरणार आहेत, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी केले.

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र शासन कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग यांच्यामार्फत जमनालाल बजाज भवन, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ परिसर, अमरावती रोड, नागपूर येथे आयोजित नमो महारोजगार मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून मेळाव्याचा शुभारंभ झाला. यावेळी रोजगार व उद्योजकता योजनांची माहिती देणाऱ्या “योजनादर्शी” पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून (Union Minister Nitin Gadkari)केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे कौशल्य, रोजगार, (Entrepreneurship Minister Mangalprabhat Lodha)उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा, (RTM University Vice Chancellor Dr. Subhash Chaudhary)रातुम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, आमदार विकास कुंभारे, आमदार प्रसाद लाड, माजी मंत्री सुभाष देशमुख, आमदार मोहन मते, आमदार कृष्णा खोपडे, आमदार अभिमन्यू पवार, आमदार प्रवीण दटके, माजी आमदार आशिष देशमुख, बंटी कुकडे, भाजयुमोच्या नेत्या शिवानी दानी, टेक महिंद्राचे निखिल अल्लूरकर, अतिरिक्त आयुक्त आशिष कुमार सिंह, माजी आमदार सुधाकर कोहळे, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी प्रवीण इटनकर, मनपाचे आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगंबर दळवी, जिल्हा कौशल्य, रोजगार, उद्योजकता अधिकारी सुनंदा बजाज यांची उपस्थिती होती.

यावेळी उपमुख्यमंत्री म्हणाले, सध्या तरुणांपुढे रोजगाराची गंभीर समस्या निर्माण झाली आहे तर उद्योजकांसमोर प्रशिक्षित मनुष्यबळाची कमतरता आहे. या दोन्हींचा मेळ घालून नमो महारोजगार मेळाव्याच्या माध्यमातून प्रशिक्षित युवकांना त्यांच्या योग्यतेचा रोजगार प्राप्त होणार आहे.

नागपूर येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या परिसरात उभारण्यात आलेल्या तीन भव्य डोममध्ये नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.पहिल्या डोममध्ये मुख्य कार्यक्रम,दुसऱ्यात देशातल्या महत्त्वपूर्ण कंपन्यांकडून मुलाखती तर तिसऱ्यात स्टार्टअप स्टॉल्स उभारण्यात आले आहेत.