

चंद्रपूर जिल्ह्यात ब्रम्हपुरी-नागभीड महामार्गावर कारचा भीषण अपघात
अपघातात २ जणांचा जागीच मृत्यू तर ३ जण जखमी
चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी-नागभीड महामार्गावर खरबी-माहेर फाट्यावर कारचा भीषण अपघात झालाय. अपघातात २ जणांचा जागीच मृत्यू तर ३ जण जखमी झाले. जखमींवर ब्रम्हपुरी येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुर आहेत. पहाटे ४:३० च्या दरम्यान कारने विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकला जोरदार धडक दिली. कारमधील लोक नागपूर येथून गडचिरोली जिल्ह्यातील वडसा येथे लग्न सोहळ्यासाठी निघाले होते. चालकाचा डोळा लागल्याने अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. दिलीप परसवानी आणि महेक परसवानी अशी मृतकांची नावं असल्याची प्राथमिक माहिती आहे. मृतक आणि जखमी सर्व एकाच कुटुंबातील सदस्य आहेत.