

पुसद वाशिम मार्गावरील सत्तरमाळ घाटात चार चाकी झाडावर आदळली
भिषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू तर अनेक ६ जण गंभीर जखमी!
पुसद (Pusad) :वाशिम मार्गावरील खंडाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सत्तरमाळ घाटात माहूर येथील रेणुका मातेचे दर्शन घेऊन घरी नगर कडे जात असताना टॉयोटा चार चाकी वाहन झाडावर आदळून भीषण अपघात झाला. या अपघातात दोघाजणांचा जागिचा मृत्यू झाला आहे तर साहजण गंभीर जखमी आहेत. नगर येथील भाविक माहूर येथील रेणुका मातेचे दर्शन आटोपून घरी जात होते.
दरम्यान सत्तरमाळ घाटात भाविकांची टोयोटा चार चाकी वाहन अनियंत्रित होऊन झाडावर आदळले. वाहनात एकूण आठ प्रवासी प्रवास करत होते. अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून साहजण गंभीर जखमी असल्याची माहिती आहे हा अपघात इतका भीषण होता की या वाहनाचा चकनाचूर झाला.
हा अपघात होऊन जवळपास दीड दोन तास अपघातग्रस्तांना मदत न मिळाल्याने हे अपघात ग्रस्त तडफडत होते त्यावेळी स्थानिकांनी घटनेची माहिती कळताच घटनास्थळी धाव घेतली त्यावेळी घटनास्थळी खंडाळा पोलीस दाखल झाले असून अपघातग्रस्तांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.