

गडचिरोली (Gadchiroli) :- Carry on ची सुविधा प्रदान करण्यात यावी या करिता शांताराम पोटदुखे आणि जनता महाविद्यालय यांच्या संयुक्त शिष्टमंडळाने प्र- कुलगुरू यांना निवेदन दिले आहे . यावेळी परीक्षा विभागातील प्रमुख आणि विद्यार्थी परिषद सदस्य सुद्धा उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सत्र 2024-2025 मध्ये प्रवेश मिळावा. आणि या वर्षी झालेल्या परीक्षेच्या निकालात अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच वर्ष वाया जाऊ नये. व विद्यार्थ्यांचे इतर मुद्यावर प्र-कुलगुरू आणि परिषद सदस्य यांच्या समक्ष मांडले. त्यावर प्र-कुलगुरू यांनी ही विद्यार्थ्यांंना सकारात्मक प्रतिसाद देत विद्यार्थी आणि त्यांच्या शिष्टमंडळ यांचे समाधान केले.
Carry on चा विषय या वर्षाकरिता लागू करणार आहोत. पण त्यात काही अटी आणि शर्ती असतील, हे ही सांगायला ते विसरले नाहीत. 6 ऑगस्ट पर्यंत परिपत्र निघून जाईल. आणि त्यानुसारच महाविद्यालयांत प्रवेशिका ला सुरवात होईल. अशी माहिती परीक्षा मंडळाने दिली आहे. विद्यापीठ (Gondwana University) प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय घेईल असे आश्वासन ही प्र-कुलगुरू यांनी यावेळी सांगितले. तसेच यासारख्या विषयवार विद्यार्थ्यांना मोलाच मार्गदर्शन सुद्धा मा. प्र-कुलगुरू यांनी केले.
यासाठी शांताराम पोटदुखे विधि महाविद्यालयाचे विद्यार्थी कौस्तुभ मीना अनिल धवणे, अनवाझ कुरेशी, सलमान खान, आचल निमगडे, श्रुती उराडे, मयूर गाडगे यांनी विशेष प्रयत्न केले. यात विधि महाविद्यालयाच्या आणि जनता महाविद्यालयाचे महेश गौरकर, अमित घोष, शशांक मंडलवार, आदिती गेडाम, चारुदत्त गेडाम, रोहन गेडाम व इतर विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.