

पश्चिम नागपुर नागरीक संघाद्वारे आयोजीत रामनवमी शोभायात्रेचा शानदार शुभारंभ
पश्चिम नागपुर नागरीक संघ, रामनगरद्वारा आयोजीत रामनवमी शोभायात्रा हे संपुर्ण नागपुरकरांच्याकरता एक आकर्षण असते.
यावर्षी पश्चिम नागपुर नागरीक संघाचे अध्यक्ष रवि वाघमारे, कार्यवाह राजीव काळेले, कोषाध्यक्ष विनोद जोशी व समस्त कार्यकारीणी व विश्वस्त मंडळाने ५०० वर्षांच्या संघर्षानंतर रामजन्मभुमी स्थानावर प्रभु रामचंद्राचे भव्य दिव्य मंदिर ऊभे राहीले या आनंदात व ऊत्साहात भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्याकरता तन. मन, धनाने प्रयत्न सुरु केले आहेत.
२०२३-२४ शोभायात्रेच्या अध्यक्षा, निलीमाताई बावणे, रामसेविका, प्रसिद्ध सामाजीक कार्यकर्त्या व दि धरमपेठ महीला मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमीटेड नागपुरच्या अध्यक्षा आहेत.
नागपुरच नव्हे तर भारतात प्रसिद्ध ऊद्योगपती व प्रखर रामभक्त बसंतलालजी साव (निको गृप) हे प्रमुख मार्गदर्शक आहेत.
निस्सीम रामभक्त महाराष्ट्राचे प्रथीतयश अधिवक्ता आनंद परचुरे हे स्वागताध्यक्ष आहेत.
अनेक स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी असणारे ऊद्योजक व राम-हनुमान भक्त लोकेश आष्टणकर हे कार्याध्यक्षपदाची धूरा सांभाळणार आहेत.
या सर्वांच्या सहकार्याने आगामी रामनवमी शोभायात्रा नक्कीच नागपुरकरांकरता संस्मरणीय अशी राहील.