

ज्येष्ठांना माहिती पाठवण्याचे आवाहन
नागपूर (Nagpur) :- 26 सप्टेंबर ज्येष्ठ नागरिक महामंडळ विदर्भ आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या संयुक्त वतीने ज्येष्ठांना आवश्यक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी ‘विशेष सेवा प्रकल्प’ राबविण्यात येणार आहे. त्यासंदर्भात नुकतीच एक बैठक पार पडली. या बैठकीला ज्येष्ठ नागरिक महामंडळ विदर्भचे सचिव अॅड. अविनाश तेलंग, डॉ. अरविंद शेंडे, प्रा. प्रभुजी देशपांडे, आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक डॉ. सोपानदेव पिसे यांची उपस्थिती होती.
या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांच्या मदतीने ज्येष्ठांना विविध प्रकारच्या सोई-सुविधा व सवलती उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला. त्या अनुषंगाने ज्येष्ठ नागरिकांनी, त्यांना कोणत्या प्रकारची सेवा हवी आहे हे आपले नाव, पत्ता व मोबाईल क्रमांक आदी माहिती अॅड. अविनाश तेलंग (94200 74125) व डॉ. अरविंद शेंडे (98222 00163) यांना पाठवावी, असे आवाहन ज्येष्ठ नागरिक महामंडळ विदर्भतर्फे करण्यात आले आहे.