
चंद्रपूरचे पहिले आमदार श्रीमंत देवाजी बापू खोब्रागडे यांची शतकोत्तर रजत जयंती उत्साहात साजरी होणार आहे. 2 जानेवारी रोजी यानिमित्त चंद्रपूर शहरात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. देवाजी बापू खोब्रागडे 1937 साली मध्य-व-हाड प्रांताच्या प्रांतिक न्याय मंडळात चांदा -ब्रह्मपुरी मतदार संघाचे प्रतिनिधित्व करणारे पहिले आमदार होते. त्यांनी बल्लारपूरचे पहिले नगराध्यक्ष म्हणूनही कारभार सांभाळला होता. त्यांच्या चंद्रपूर जिल्ह्यातील सामाजिक व विधिमंडळ कामाच्या गौरवार्थ दोन जानेवारी रोजी प्रियदर्शनी सांस्कृतिक सभागृहात टपाल विभागाच्या वतीने विशेष आवरण अनावरण सोहळा संपन्न होत आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने भव्य प्रबोधन सभा देखील आयोजित करण्यात आली असून त्यांच्या जीवनपटावर आधारित एक चित्रपट देखील दाखवण्यात येणार आहे. याच कार्यक्रमाच्या निमित्ताने एक निबंध स्पर्धा देखील ठेवण्यात आली असून या कार्यक्रमाला व स्पर्धात सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे