उच्च न्यायालयाच्या निर्णयाने विरोधकांना चपराक

0

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सुरूच राहणार
लोकाभिमुख योजनेवर न्यायालयाचेही शिक्कामोर्तब
शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉ. मनीषा कायंदे यांनी मानले न्यायालयाचे आभार

मुंबई (Mumbai), ता. ५ ऑगस्ट २०२४

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या (Chief Minister Majhi Ladaki Baheen Yojana)विरोधातील याचिका माननीय मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावत महायुती सरकारच्या लोकाभिमुख योजनेवर शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे विरोधकांना चपराक बसली असल्याचे शिवसेना सचिव आणि प्रवक्त्या डॉ.मनीषा कायंदे (Shiv Sena Secretary and Spokesperson Dr. Manisha Kayande)यांनी म्हटले आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरु राहणार असून रक्षाबंधनाच्या पवित्र पर्वात लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री भावाची भेट मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचे ही त्यांनी सांगितले.

नवी मुंबईतील चार्टर्ड अकाउंटन्ट यांच्या माध्यमातून वकील ओवैस पेचकारी यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी या योजनेसह इतर योजनांचा शासनाच्या तिजोरीवर अतिरिक्त भार पडेल, या आशंकेवर आधारित मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल होती. मात्र न्यायालयाने ही याचिका फेटाळून न्यायालयाने महायुती सरकारच्या लोकाभिमुख धोरणांवर शिक्कामोर्तब केले असल्याचे डॉ. मनीषा कायंदे यांनी म्हटले आहे.

कायंदे पुढे म्हणाल्या की, समाजातील गरजू महिलांना दरमहा १५०० रुपये साह्य देणारी योजना अतिशय लोकप्रिय झाली आहे. या योजनेमुळे सरकारची प्रतिमा उंचावली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांची लोकप्रियता वाढली आहे. त्यामुळे विरोधकांचा पोटशूळ उठला असल्याने, या योजनेच्या विरोधात, विरोधकांच्या मदतीनेच याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र न्यायालयाने हा सरकारचा धोरणात्मक निर्णय असून यावर हस्तक्षेप करता येणार नसल्याचे सांगून याचिका फेटाळली. या निर्णयाबाबत न्यायालयाचे आभार मानत असल्याचेही त्यांनी सांगितले.

Mazi ladki bahin yojana official website
Ladki bahin yojana app
Ladki bahin yojana list
Ladki bahin yojana yadi
Majhi ladki gov in
Ladki bahin yojana status
Ladki bahin yojana form pdf
Mazi ladki bahin yojana online application