
अमरावती- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने एक सही संतापाची असे बॅनर अमरावतीच्या राजकमल चौकामध्ये लावण्यात आले असून या बॅनरवर एक मजकूर लिहला आहे. आज राजकारणाचा चिखल झाला आहे का ? माझ्या मताला काही किंमत आहे का ? असा मजकूर यावर लिहला आहे. एकदा मतदान केलं की तुम्हाला पाच वर्षे गृहीत धरणार? अशा प्रकारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने बॅनर बाजी करण्यात आली आहे. या बॅनरने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.