उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते युवा मार्ग जॉब पोर्टलचा शुभारंभ

0

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते युवा मार्ग जॉब पोर्टलचा शुभारंभ

उत्स्फूर्त प्रतिसादामुळे कंपन्यांचे एच आर समाधानी

नागपूर, दि. ११ डिसेंबर २०२३ :

कौशल, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, महाराष्ट्र शासनातर्फे जमनालाल बजाज प्रशासकीय भवन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ परिसर, नागपूर येथे आयजित नमो महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता.
मेळाव्यात सहभागी झालेल्या कंपन्यांना एकाच छताखाली विविध शैक्षणिक पात्रतेचे उमेदवार मिळाल्याने मोठा लाभ झाला. या मेळाव्यात विविध जिल्ह्यांमधील उमेदवारांनी सहभाग नोंदवला होता. या मेळाव्याने अनेक तरुणांना नोकरी उपलब्ध करून दिल्या आहेत. उत्स्फूर्त प्रतिसादामुळे कंपन्यांचे एच आर समाधानी झाले.

दरम्यान, नवयुवक-युवतींना इच्छित रोजगाराचा माग घेता यावा याकरिता श्री. कुणाल पडोळे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या युवा मार्ग जॉब पोर्टलचा शुभारंभ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते झाले.
यावेळी आ. प्रवीण दटके, आ. प्रसाद लाड, शिवानी दानी, निधी कामदार, माजी नगरसेवक संदीप गवई, बाल्या बोरकर आदी उपस्थित होते.

या पोर्टलद्वारे युवक युवती रोजगाराच्या संधीचा नियमित शोध घेऊ शकतील आणि आपल्या शैक्षणिक पात्रतेला साजेशी नोकरी मिळवू शकतील. या पोर्टलवर नोकरी शोधणाऱ्या युवक-युवतींची माहिती, त्यांच्या शैक्षणिक पात्रता, कौशल्ये, अनुभव इत्यादी माहिती असेल. तसेच, नोकरी देणाऱ्या कंपन्यांची माहिती, त्यांच्याकडील नोकरीच्या संधी, पगार, कामाचे ठिकाण इत्यादी माहिती देखील या पोर्टलवर असेल.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले की, युवा मार्ग जॉब पोर्टल हा नवयुक-युवतींसाठी एक महत्त्वाची संधी आहे. या पोर्टलमुळे त्यांना त्यांच्या इच्छित रोजगाराचा माग घेता येईल. तसेच, कंपन्यांनाही त्यांच्यासाठी योग्य उमेदवार शोधणे सोपे होईल.

कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले, युवा मार्ग जॉब पोर्टल हा नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून बनवण्यात आला आहे. या पोर्टलमुळे नोकरी शोधणे आणि देणे सोपे होईल.

या पोर्टलचे संचालक श्री कुणाल पडोळे यांनी सांगितले की, या पोर्टलवर नोकरी शोधणाऱ्या युवक-युवतींसाठी अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या पोर्टलमुळे त्यांना त्यांच्या इच्छित रोजगार शोधणे सोपे होईल. त्यामुळे तरुणांनी ऑनलाइन माध्यमातून नोकरी शोधावी, असे आवाहन केले. ॲपच्या शुभारंभानंतर शेकडो तरुणांनी वेबसाईटवर भेट देऊन जॉब सर्च केला, हे विशेष.

नागपूर येथे आयोजित दोन दिवसीय नमो महारोजगार मेळाव्यात राज्यातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या एकूण ५५२ कंपन्या सहभागी झाल्या. यावेळी युवाशक्ती फाउंडेशनतर्फे १२६३ रोजगार नियुक्ती पत्र देण्यात आले. १० ते पदवी पर्यंतच्या तरुणांना महिंद्रा अँड महिंद्रा नाशिक, हिताची जलगाव, मेंढा ग्रूप पुणे येथे नोकरी देण्यात आली.

या मेळाव्याच्या माध्यमातून सहभागी कंपन्यांना आवश्यक असलेल्या सर्व पदांसाठी अनुभवी तसेच उच्च शिक्षित उमेदवारांची निवड करता आली.

दोन दिवस सलग चार हजार उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. हा अनुभव कधीही विसरता येणार नाही. नोकरी इच्छुक उमेदवारांना संपर्क करून त्यांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल. यापुढेही याप्रकारच्या महारोजगार मेळाव्यात आम्ही नक्की सहभागी होऊ, असे आश्वासन स्पेसवूडच्या एचआर मॅनेजर विप्लवी व्यास, बेलरिज इंड्ट्रीजच्या आईशा मट्टीकोप, आशिष खोले, सुहास बिरेवार, डॉ. अँजेलिना डियास, प्रसाद पंचखेडे, मनोज चव्हाण, कुणाल पडोळे यांनी दिले.