प्लॅस्टिक मुक्तीसाठी सामाजिक जाणिवेची खरी गरज

0

अहमदनगर(Ahmednagar), 8 जुलै:- नागरिक सर्रासपणे प्लास्टिक पिशवीचा वापर करताना दिसत आहे.त्यामुळे पर्यावरणाची मोठी हानी होत असून आरोग्याचा व स्वच्छतेचा प्रश्न निर्माण होत आहे.प्लास्टिक बंदी ही काळाची गरज असून यासाठी नाग रिकांमध्ये जनजागृती होणे गरजेचे आहे,शासन मोठ्या प्रमाणात विविध उपक्रम राबवत आहे.मात्र नागरिक याकडे दुर्लक्ष करत मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशवीचा वापर करत आहे.प्रत्येक नागरिकाने कापडी पिशवीचा वापर केल्यास प्लास्टिक मुक्ती नक्की होईल व आपल्या शहर स्वच्छ व सुंदर राहण्यास मदत होईल.प्लास्टिक मुक्तीसाठी सामाजिक जाणीवची खरी गरज असल्याचे प्रतिपादन प्रभारी आयुक्त सौरभ जोशी यांनी केले.

अहमदनगर महानगरपालिका व बिग एफ एम रेडिओच्या वतीने जनजागृती व कापडी पिशवीचे वाटप करण्यात आले.यावेळी प्रभारी आयुक्त सौरभ जोशी,आर.जे.गायत्री,प्रवीण गारदे,प्रशांत चांदणे,प्रशांत उमाप,सुरेश वाघ, बाळासाहेब विधाते,सुरज वाघ,भालेराव यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.आर.जे.गायत्री म्हणाल्या की,जागतिक प्लास्टिक बंदीनिमित्त अहमदनगर महानगरपालिका व बिग एफ एम रेडिओच्या वतीने शहरातील गांधी मैदान, चितळे रोड,भिंगारवाला चौक,मोची गल्ली,विशाल गणपती,चाणक्य चौक,पुणे बस स्टॅन्ड येथे कापडी पिशवीचे वाटप करत प्लास्टिक बंदी बाबत नागरिकांमध्ये जनजागृती केली.