पोलीस ठाण्याच्या क्वार्टरमध्ये पोलीस कर्मचाऱ्याने घेतला गळफास

0

चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर पोलीस ठाण्याच्या कर्मचारी क्वार्टरमध्ये पोलीस कर्मचाऱ्याची गळफास लावून घेत आत्महत्या

घरात मृतदेह तीन दिवसांपासून होता लटकत 

चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरातल्या गांधी वॉर्डातील पोलीस कर्मचारी क्वार्टरमध्ये राहणारे अजय मोहुर्ले यांच्या घरातून दुर्गंधी येत असल्याचे लक्षात येताच संकुलातील रहिवाशांनी पोलिसांना माहिती दिली. पोलीसांनी घटनास्थळी दाखल होत दरवाजा तोडला. आत प्रवेश केला असता पोलीस कर्मचारी अजय मोहुर्ले याने गळफास लावून आत्महत्या केल्याचे दिसून आले. या घटनेची दुर्गंधी संपूर्ण परिसरात पसरली होती. गेल्या तीन वर्षांपासून मयत अजयची पत्नी दोन्ही मुलांसह त्याच्या आईच्या घरी गेली होती. या तणावातून पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची चर्चा आहे. घटनेची माहिती कुटुंबीयांना देण्यात आली असून पोलिस पथक अधिक तपास करत आहे.