हेमांगी कवी, कुशल बद्रिकेसोबतच्या आपल्या आगामी गॅगविषयी सांगत आहे गौरव मोरे
मुंबई(Munbai), १२ मे ‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’ मध्ये हेमांगी कवी आणि कुशल बद्रिकेसोबतच्या आपल्या आगामी गॅगविषयी सांगत आहे, गौरव मोरे
सूर, ताल आणि कॉमेडी! आपल्या शोची रंजकता आणखी वाढवण्यासाठी सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’ शो मध्ये या आठवड्यात सुपरस्टार सिंगर 3 चे स्पर्धक पिहू शर्मा, आविर्भाव एस. आणि क्षितिज सक्सेना यांचे स्वागत करण्यात येणार आहे.
होस्ट हर्ष गुजराल एक खळखळून हसवणारा स्टँड अप अॅक्ट देईल ज्यात तो सुपरस्टार सिंगरमधल्या प्रतिभावान मुलांशी आपल्या बालपणाची गंमतीदार तुलना करताना दिसेल. कुशल बद्रिके आणि हेमांगी कवी ही तूफान जोडी ‘नवरा बायको के घर में आया चोर’ या स्किटमध्ये गौरव मोरेसोबत दिसेल. या स्किटमध्ये नेहमीप्रमाणे कुशल एक सतत त्रासलेला ‘नवरा’ साकारेल आणि हेमांगी त्याची उत्साही ‘बायको’ साकारेल. गौरव या स्किटमध्ये एका मिश्किल चोराच्या भूमिकेत दिसेल.
काम करून दमलेल्या नवऱ्याला शांतता हवी आहे पण त्याच्या बायकोने शॉपिंगला जाण्यासाठी त्याच्यामागे लकडा लावला आहे. या गोंधळात एक चोर काही ‘संस्कार’ शोधत त्यांच्या घरात शिरतो आणि मग जी काही धमाल उडते, ती बघायला प्रेक्षकांना नक्कीच आवडेल!
या आपल्या आगामी गॅगविषयी बोलताना गौरव मोरे म्हणतो, “चोराच्या भूमिकेत एक नवीन ट्विस्ट आणण्यास मी उत्सुक आहे. हा चोर केवळ मौल्यवान वस्तू चोरत नाहीये, तर संस्कार शोधतोय. हेमांगी आणि कुशल या अफलातून जोडीसोबत काम करताना धमाल आली. ते सेटवर इतकी ऊर्जा आणि सर्जनशीलता घेऊन येतात! त्यांच्या प्रमाणेच यावेळी सुपरस्टार सिंगर 3 च्या उस्तादांनी या मंचाला वेगळीच मोहकता बहाल केली. हे स्किट म्हणजे प्रेक्षकांसाठी पर्वणीच असेल. यात भरपूर हास्य, अनपेक्षित क्षण आणि अतरंगी पात्रे आहेत.”
बघायला विसरू नका, ‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’ या रविवारी रात्री 9:30 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर!
सूर, ताल आणि कॉमेडी! आपल्या शोची रंजकता आणखी वाढवण्यासाठी सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’ शो मध्ये या आठवड्यात सुपरस्टार सिंगर 3 चे स्पर्धक पिहू शर्मा, आविर्भाव एस. आणि क्षितिज सक्सेना यांचे स्वागत करण्यात येणार आहे.
होस्ट हर्ष गुजराल एक खळखळून हसवणारा स्टँड अप अॅक्ट देईल ज्यात तो सुपरस्टार सिंगरमधल्या प्रतिभावान मुलांशी आपल्या बालपणाची गंमतीदार तुलना करताना दिसेल. कुशल बद्रिके आणि हेमांगी कवी ही तूफान जोडी ‘नवरा बायको के घर में आया चोर’ या स्किटमध्ये गौरव मोरेसोबत दिसेल. या स्किटमध्ये नेहमीप्रमाणे कुशल एक सतत त्रासलेला ‘नवरा’ साकारेल आणि हेमांगी त्याची उत्साही ‘बायको’ साकारेल. गौरव या स्किटमध्ये एका मिश्किल चोराच्या भूमिकेत दिसेल.
काम करून दमलेल्या नवऱ्याला शांतता हवी आहे पण त्याच्या बायकोने शॉपिंगला जाण्यासाठी त्याच्यामागे लकडा लावला आहे. या गोंधळात एक चोर काही ‘संस्कार’ शोधत त्यांच्या घरात शिरतो आणि मग जी काही धमाल उडते, ती बघायला प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.