25 नोव्हेंबरला बांबू क्षेत्रातील प्रमुख सदस्यांची बैठक,‘अ‍ॅडव्हांटेज विदर्भ’ होणार चर्चा

0

 

नागपूर: जानेवारी महिन्यात नागपुरात होऊ घातलेल्या ‘अ‍ॅडव्हांटेज विदर्भ’च्या पार्श्वभूमीवर शनिवारी 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता जोग सेंटर, तात्या टोपे नगर येथे बांबू क्षेत्रातील प्रमुख सदस्यांची बैठक आयोजित कारणात आली आहे. बांबू क्षेत्रातील संधी आणि आव्हाने यावर या बैठकीत विचारमंथन होणार आहे. असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट ऑफ विदर्भ (एआयडी) तर्फे जानेवारीमध्ये नागपुरात 3 दिवसीय एक्स्पो आणि बिझनेस कॉन्क्लेव्ह आयोजित करणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेवर आधारित असलेले, ‘ऍडव्हान्टेज विदर्भ’ गुणवत्ता वाढीसाठी, बांबू क्षेत्रातील नामवंत व्यक्तींमार्फत ज्ञानाच्या देवाण घेवाणीसाठी, व्यवसायाच्या संधी, विस्ताराच्या संधी इत्यादींसाठी एक उत्तम व्यासपीठ असेल. ज्ञानवृद्धी आणि बांबू क्षेत्राच्या प्रगतीसाठी या बैठकीला विशेष महत्त्व आहे. सुनील जोशी आणि एडचे सचिव डॉ विजय शर्मा आणि प्रदीप माहेश्वरी या बैठकीत प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.