

नागपूर- कर्नाटकमधील बेलगाम जिल्ह्यात 5 जुलै रोजी जैन समाजाचे आचार्य श्री कामकुमार नंदीजी महाराज यांची काही असामाजिक तत्वांच्या लोकांनी मिळून अतिशय विदारक पद्धतीने नृशन्स हत्या केली. आरोपींनी आचार्य कामकुमार यांची आधी विजेचा करंट देऊन हत्या केली, मृतदेहाचे 35 तुकडे केले.
शांती आणि अहिंसेचा संदेश देणाऱ्या या समाजाच्या आचार्यांवर झालेली ही पहिली अत्यंत भयावह आणि वेदनादायी अशी घटना आहे. या घटनेचा निषेध म्हनून आज गांधी पुतळा चौक इतवारी परिसरातून संविधान चौक पर्यंत शांती मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजारो जैन समाजबांधव उपस्थित झाले.
भारतवर्षीय दिगम्बर जैन तीर्थक्षेत्र कमिटी आणि सकल जैन समाजाच्या वतीने काढण्यात आलेल्या या शांती मोर्चा दरम्यान या घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली. संविधान चौकात या मोर्चाचे भव्य सभेत रूपांतर झाले. मान्यवरांची भाषणे झाली. दोषींना कठोर शासन व्हावे अशी मागणी करणारे एक निवेदन शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन दिले. निवेदन देतान्ना संतोष पेंढारी जैन, महेंद्र सिंघवी, पवन जैन, अतुल कोटेचा, प्रशांत मानेकर जैन, आनंद मौजिलाल जैन, डॉ रिचा जैन, राकेश पाटनी, पवन झांझरी, अनिल गडेकर आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते