पेपरफुटीबाबतचा कायदा महाराष्ट्रात आला पाहिजे – रोहित पवार

0

 

नागपूर- पुणे ते नागपूर 800 किलोमीटर युवकांच्या प्रश्नावर, युवा संघर्ष यात्रेसाठी चालल्यानंतर शेवटच्या दिवशी विधानभवनात जाताना लाठीहल्ला झाला. मुख्यमंत्र्यांकडे अनेक मागण्या केल्या. त्यातली एक मागणी पेपर फूटीबद्दल होती. इतर राज्यात आहे,तसा पेपर फूटीबद्दल उशीर न करता कडक कायदा आणण्याची गरज राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की आम्ही कारवाई करू. पण अशी कारवाई करत असाल तर ती फसवेगीरी आहे.
मुख्यमंत्र्यांना परत विनंती करतो की पुढच्या १० ते १५ दिवसात हा पेपर फूटीबद्दल कायदा आपल्या महाराष्ट्रात आला पाहिजे. आमदार अपात्रता संदर्भात केवळ वेळकाढूपणा सुरू आहे. केवळ तारीख पे तारीख धोरण सुरू असल्याचे टीकास्त्र रोहित पवार यांनी सोडले.