निवडणुकीत मराठा समाज मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज भरणार !

0

 

सोलापूर (Solapur)- आगामी लोकसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यातील ३ लोकसभा मतदार संघातून मराठा समाज मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज भरणार आहेत. सकल मराठा समाज सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर, माढा आणि धाराशिव या लोकसभा मतदारसंघातून प्रत्येक गावातून 4 उमेदवार लोकसभेसाठी अर्ज भरणार आहेत.

लोकवर्गणी जमा करून सकल मराठा समाज उमेदवारी भरण्याचा सोलापूर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी ठराव मंजूर केला. सोलापूर शासकीय विश्रामगृहात आज सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील मराठा बांधवांची बैठक पार पडली. राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा प्रश्न पूर्णपणे सोडवला नसल्याने मराठा समाजाने ही भूमिका घेतली असल्याचे
माऊली पवार (समन्वयक, सकल मराठा समाज) यांनी सांगितले.