नववर्षानिमित्त श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी

0

 

सोलापूर SOLAPUR – नववर्षानिमित्त शिर्डी, कोल्हापूर, तुळजापूर, पंढरपूर, शेगावला भाविकांची मोठी गर्दी आहे. अक्कलकोटला श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी असून
वटवृक्ष स्वामींचे दर्शन घेण्यासाठी ३ ते ४ किलोमीटर पर्यंतच्या रांगा लागल्या आहेत. नववर्षाच्या पहिल्या दिवशी पहिले दर्शन घेण्यासाठी श्री स्वामी भक्त हजारोंच्या संख्येने अक्कलकोट मध्ये दाखल झाले आहेत. भक्तांची मोठी गर्दी असल्याने पोलिसांचा चोख बंदोबस्त लावला गेला आहे. महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र, तेलंगणा,गुजरात आणि गोव्यातून स्वामीभक्त अक्कलकोट नगरीत दाखल झाले आहेत.