पाहा या विषयावर करण्यात आले ज्ञानसत्राचे आयोजन

0

जनसंपर्क आयुधांचा प्रभावी वापर आपल्या जीवनसोबतच व्यवसायात देखील घडवितो सकारात्मक बदल : पीआरसीआय

 

 

नागपूर(Nagpur):-पब्लिक रिलेशन्स कौन्सिल ऑफ इंडिया (पी.आर.सी.आय) ने सॅटरडे क्लब ग्लोबल ट्रस्ट, नागपूर चॅप्टरच्या संयुक्त विद्यमाने ०१ जून २०२४ रोजी चिटणवीस सेंटर येथे लघु व मध्यम उद्योगांसाठी (एस.एम.ई) जनसंपर्क या विषयावर ज्ञानसत्र आयोजित करण्यात आले. सत्राची सुरुवात उपस्थित एस.एम.ई प्रतिनिधींच्या संक्षिप्त परिचयाने झाली, त्यानंतर पी.आर.सी.आयचे महाराष्ट्र राज्य प्रमुख श्री आशीष तायल आणि नागपूर चॅप्टरचे अध्यक्ष श्री निखिलेश सावरकर यांनी उपस्थितांना संबोधित केले.

या सत्रादरम्यान विविध एस.एम.ईं च्या प्रतिनिधींना व्यवसायात जनसंपर्काची भूमिका आणि जनसंपर्क साधनांचा नियमित वापर त्यांच्या व्यवसाय वाढीस कसा सहाय्यक ठरतो, यावर प्रकाश टाकण्यात आला. नंतर एस.एम.ईं प्रतिनिधींनी जनसंपर्क साधनांच्या वापराबाबत विचारलेल्या प्रश्नांची तज्ज्ञ वक्त्यांनी सुस्पष्ट व समर्पक उत्तरे दिली. ज्ञानसत्रादरम्यान बोलताना श्री तायल म्हणाले की, “आपण सर्वजण कळत-नकळत आपल्या दैनंदिन जीवनात जनसंपर्क साधनांचा वापर करतो, परंतु या साधनांचा सचेतपणे वापर केल्यास ते आपल्या जीवनाबरोबरच व्यवसायातही मोठा अर्थपूर्ण बदल घडवू शकतात.” जनसंपर्काच्या नैतिक वापरामुळे लोकांच्या जीवनात महत्वपूर्ण बदल झाल्याची काही उदाहरणे देखील त्यांनी दिली. एस.एम.ईं शी संबंधित प्रश्नांची उत्तरे श्री तायल आणि श्री सावरकर(Shri Savarkar) यांनी संयुक्तपणे दिली .

सदर ज्ञानसत्रात सॅटरडे क्लब ग्लोबल ट्रस्टचे विदर्भ समन्वयक प्रफुल्ल हातगावकर, नागपूर चॅप्टरचे अध्यक्ष बागेश महाजन, कोषाध्यक्ष शरद अडसडे, पनवेल चॅप्टरच्या ॲड. कल्याणी टपाल तसेच सॅटर्डे क्लबचे विविध व्यावसायिक सदस्य देखील प्रामुख्याने उपस्थित होते.