

हेलिकॉप्टर दुरूस्तीला नेताना झाला अपघात
केदारनाथ:- एका खासगी कंपनीचे नादुरुस्त हेलिकॉप्टर एमआय-17 च्या मदतीने दुरुस्तीसाठी नेताना खाली कोसळल्याची घटना आज, शनिवारी उत्तराखंडच्या केदारनाथ येथे घडली. अपघातग्रस्त हेलिकॉप्टर केदारनाथ (Kedarnath) येथून गौचरला नेण्यात येत होते.
यासंदर्भातील माहितीनुसार नादुरुस्त हेलिकॉप्टर एमआय-17 हेलिकॉप्टरच्या मदतीने नेत असताना आज, शनिवारी सकाळी या हेलिकॉप्टरचा दोर तुटला. त्यामुळे हे हेलिकॉप्टर लिंचोली नजीक मंदाकिनी नदीजवळ कोसळले. सुदैवाने या अपघातात कुणालाही इजा झालेली नाही. या दुर्घटनेनंतर एनडीआरएफचे पथक घटनास्थळी पोहचले. अपघातग्रस्त हेलिकॉप्टरचे अवशेष एनडीआरएफने गोळा केलेत. सदर हेलिकॉप्टर केदारनाथ मंदिरात जाणाऱ्या भाविकांना सेवा देत होते. परंतु, मुसळधार पावसामुळे या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाला होता