

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, नागपूर शाखेचे आयोजन
नागपूर (NAGPUR), 3 मे
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ (एबीबीएम), नागपूर शाखा यांच्या वतीने श्री परशुराम जन्मोत्सवानिमित्त भव्य रॅलीचे आयोजन रविवार, ४ मे २०२५ रोजी सकाळी ६.३० वाजता वर्धा रोडवरील गोरक्षण मंदिर येथून प्रारंभ होईल.
परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) कॅप्टन आशिष काळे आणि अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री. निखिल लातुरकर यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे. गोरक्षण मंदिर येथून निघालेली ही रॅली रहाटे कॉलनी चौक, लोकमत चौक, काचीपुरा चौक, बजाजनगर चौक, लक्ष्मीनगर चौक मार्गे खामला चौक, प्रतापनगर चौक, माटे चौक व पुढे शंकरनगर चौक येथून निघून रामनगर येथील हनुमान मंदिराच्या मागील मैदानावर रॅलीचा समारोप होईल.
पारंपरिक शंखनाद पथक, परशुराम रथ आणि राम मंदिर प्रतिकृती, शिवकालीन शस्त्रांचे भव्य प्रदर्शन ही रॅलीची प्रमुख आकर्षणे राहणार असून प्रमुख चौकांवर रॅलीचे भव्य स्वागत करण्यात येणार आहे. समारोपीयस्थळी आयोजित महाप्रसाद वितरण केले जाणार आहे, असे महासंघाचे अध्यक्ष नितीन पटवर्धन यांनी कळवले आहे. या रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन उपाध्यक्ष पंकज खिरवडकर, संयोजक पराग जोशी यांनी केले आहे.