

नागपूर NAGPUR – गेले आठ दिवसांपासून नागपूर येथे हिवाळी अधिवेशन Winter session सुरू आहे.या हिवाळी अधिवेशनावर विविध पक्ष संघटनांनी आतापर्यंत अनेक मोर्चे काढले आहेत. आज खाजगी वाहन चालक संघटना जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थेने अधिवेशनावर मोर्चा काढला.
फक्त सरकार आश्वासन देत असल्याची टीका यावेळी वाहन चालकांनी सरकारवर केली . बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात योजनेच्या क्षमतेत वाढ करावी, इ-चालान बंद झाले पाहिजे, अपघात झाल्यास प्रवाशी चालकांना मारहाण करतात तर अशा प्रवाशांवर कारवाई केली पाहिजे, चालकांना आराम करण्यासाठी विश्रांतीगृह व उपहारगृहे यांची निर्मिती करावी, वाहन चालकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कठोर कायद्याची तरतूद करण्यात यावी, वाहन चालकांसाठी महामंडळाची घोषणा करावी या व इतर मागण्यांसाठी खाजगी वाहन चालक संघटना जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थेने नागपूर हिवाळी अधिवेशनावर हा महामोर्चा काढला
अशी माहिती अध्यक्ष संजय हळनोर, शोभना गौरशेट्टीवार, विदर्भ वाहन चालक अध्यक्ष यांनी दिली.