

आमदार किशोर जोरगेवार यांची अधिकाऱ्यांसह नियोजन बैठक, १० जुलै पासून सुरु होणार नोंदणी
चंद्रपूर (Chandrapur):- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त २२ जुलै ते २८ जुलै या कालावधीत आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने सेवा सप्ताह राबविण्यात येत आहे (Chief Minister Devendra Fadnavis). या उपक्रमाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून २७ जुलै रोजी रामबाग मैदानात भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यासंदर्भात आज आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिकारी आणि डॉक्टरांच्या संघांसोबत नियोजन बैठक घेतली.
वन विभागाच्या रामबाग येथील विश्रामगृह येथे आयोजित या बैठकीस शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, चंद्रपूर महानगरपालिकेचे आयुक्त विपिन पालीवाल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. महादेवराव चिंचोळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, वन विभागाचे सहायक वनसंरक्षक विवेक नाटू, इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. दीक्षित, आचार्य विनोभा भावे रुग्णालयाचे शिंगणे, ज्युपिटर हॉस्पिटलचे डॉ. स्वप्निल वावडीकर, नॅशनल कॅन्सर हॉस्पिटलचे डॉ. पवन अगराडे यांच्यासह विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी भाजपचे महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, प्रदेश निमंत्रित सदस्य तुषार सोम, माजी शहर अध्यक्ष दशरथसिंह ठाकूर, प्रकाश देवतळे, अजय जयस्वाल, मनोज पाल, नामदेव डाहुले, संजय बुरघाटे, माजी नगरसेवक प्रदीप किरमे, राजेंद्र अडपेवार, संदीप आवारी, देवानंद वाढई, रवि गुरनूले, वंदना हातगावकर, सविता दंढारे, सायली येरणे, अमोल शेंडे, राशिद हुसेन, नकुल वासमवार, जितेश कुळमेथे, करणसिंह बैस, मंगेश अहिरकर आदींची उपस्थिती होती.
आमदार किशोर जोरगेवार (Kishore Jorgewar) यांनी सर्व विभागांनी समन्वय साधत काम करावे आणि शिबिरात रुग्णांना उत्तम आरोग्य सेवा मिळेल याची खात्री करावी, असे निर्देश दिले. शिबिराचे स्थळ, सुविधा, आवश्यक वैद्यकीय उपकरणे, औषधे आणि पथकांची रचना याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. गरजू रुग्णांपर्यंत अधिकाधिक आरोग्य सेवा पोहोचवणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या शिबिरासाठी महापालिका आरोग्य विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जिल्हा परिषद आरोग्य विभाग, ज्युपिटर हॉस्पिटल, सावंगी मेघे, कस्तुरबा हॉस्पिटल सेवाग्राम, श्री सनवरलाल जोधपूर हॉस्पिटल, इंडियन मेडिकल असोसिएशन, नॅशनल कॅन्सर हॉस्पिटल यांचे सहकार्य लाभणार आहे.
शिबिराआधी १० जुलै ते १९ जुलै दरम्यान महापालिकेची १४ आरोग्य वर्धिनी केंद्रे, ७ शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच ग्रामीण भागातील प्राथमिक व उप आरोग्य केंद्रांमध्ये रुग्णांची नोंदणी व प्राथमिक तपासणी केली जाणार आहे. गंभीर आजार आढळल्यास २७ जुलैपूर्वी आवश्यक तपासण्या पूर्ण करून शिबिराच्या दिवशी तज्ञ डॉक्टरांकडून सल्ला आणि पुढील उपचार दिले जाणार आहेत.
या शिबिरात कर्करोग तपासणी, सर्वसाधारण आरोग्य तपासणी, नेत्ररोग तपासणी, हृदयरोग तपासणी, न्यूरोलॉजिस्ट तपासणी, अस्थिरोग तपासणी, स्त्रीरोग तपासणी, बालरोग तपासणी, कान-नाक-घसा तपासणी, त्वचारोग तपासणी, श्वसन रोग तपासणी, सर्जरी तज्ञ तपासणी, अॅक्यूप्रेशर तपासणी आणि श्री सनवरलाल ऑस्टिओपथ चॅरिटेबल संस्थान (जोधपूर, मुंबई) यांच्या माध्यमातून अस्थिरोग तपासणी अशा विविध सेवा मोफत दिल्या जाणार आहेत. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिकाऱ्यांसह आरोग्य शिबीर आयोजित असलेल्या जागेची पाहणी केली.