
संत प्रेमधन लालनजी महाराजांच्या पावन उपस्थितीत ३ एप्रिलपासून कथा आरंभ
नागपूर (Nagpur) – कामठी रोडवरील लांबा सेलिब्रेशन येथे ३ एप्रिलपासून १२ एप्रिल २०२५ पर्यंत श्रीराम कथेचा भव्य व भक्तिमय सोहळा संपन्न होणार आहे. या कथामालेसाठी वृंदावनधामातील प्रख्यात संत श्री प्रेमधन लालनजी महाराज उपस्थित राहणार आहेत.

या धार्मिक महोत्सवाचा संकल्प गिरीजा विजयकुमारजी तेलवाले यांनी केला असून, सीए अजय अग्रवाल, सीए अमर अग्रवाल यांच्या संयुक्त आयोजनाखाली हा कार्यक्रम पार पडणार आहे. दिनांक ३ एप्रिल रोजी संध्याकाळी ६:३० वाजता संतांच्या आगमनानंतर भव्य शोभायात्रेने सुरुवात होईल. रामकथा ४ एप्रिलपासून दररोज दुपारी ३:३० ते संध्याकाळी ६:३० वाजेपर्यंत वाचली जाणार आहे. समारोप १२ एप्रिल रोजी सकाळी १०:३० ते दुपारी १:३० या वेळेत होणार आहे.

श्री प्रेमधन लालनजी महाराज हे देशविदेशात कथा-कीर्तनाचे सेवाकार्य करतात. याप्रसंगी संपूर्ण अग्रवाल कुटुंबीयांनी नागपूरकरांना उपस्थित राहून रामकथेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
















