
नागपूर -श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या अमरावती येथील मोर्शी रोडवरील 70 एकर विस्तीर्ण क्षेत्रात शेतात उभी पिके असलेल्या अभिनव प्रदर्शनाचे आयोजन दि 27 ते 30 डिसेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने हे प्रदर्शन होत आहे.देशाचे पहिले कृषिमंत्री व थोर शिक्षण तज्ञ डॉ पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या 125 व्या शतकोत्तर रौप्य महोत्सव जयंती निमित्ताने हे भव्य कृषी प्रदर्शन होणार असल्याची माहिती शी शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख यांनी पत्रपरिषदेत दिली. यानिमित्ताने भाऊसाहेब देशमुख यांचे नाणे, छायाचित्रांचे पुस्तक, चर्चासत्र आदी विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.