Art field: कला क्षेत्रातील कलाकारांचा भरला मेळा

0

‘नागपुरी कलाकार कट्टा’ देईल सांस्‍कृतिक चळवळीला बळ

नागपूर (nagpur), 21 जुलै
गुरुपौर्णिमेच्‍या मुहूर्तावर साहित्‍य, नाटक, चित्रकला अशा विविध कला क्षेत्रातील कलाकारांचा रविवारी विष्‍णुजी की रसोई येथे मेळा भरला. धनवटे रंगमंदिराच्‍या आठवणींना उजाळा देत ज्‍येष्‍ठ कलाकारांनी ‘नागपुरी कलाकार कट्टा’ (‘Nagpuri Artist Katta’)हा उपक्रम नागपूरच्‍या सांस्‍कृतिक चळवळीला बळ (A boost to the cultural movement)दिला असा विश्‍वास व्‍यक्‍त केला.

शहरातील विखुरलेले कलावंत एकत्र यावे, वैचारिक व कलात्‍मक आदान-प्रदान व्‍हावी, त्‍यांना आपली कला प्रदर्शित करता यावी या उद्देशाने ‘नागपुरी कलाकार कट्टा’ या अभिनव उपक्रमाला प्रारंभ करण्‍यात आला. ‘नागपुरी कलाकार कट्टा’ चे उद्घाटन 88 वर्षीय ज्‍येष्‍ठ रंगकर्मी मधूभैया जोशी व महेश पातुरकर यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. तत्‍पूर्वी, दिवाडकर्स अजित बेकरीचे संचालक व रंगकर्मी स्‍व. अजित दिवाडकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्‍यात आली.
प्रास्‍ताविकातून प्रसिद्ध शेफ विष्‍णू मनोहर यांनी नागपुरा कलाकार कट्टाच्‍या निर्मितीमागची भूमिका विशद केली. ते म्‍हणाले, पूर्वी धनवटे रंगमंदिरात सर्व कला क्षेत्रातील कलाकार येत असत. त्‍यांच्‍या गप्‍पा होत. नवनवीन कल्‍पना समोर येत असत. रंगमंदिराची पडझड झाल्‍यानंतर नागपूरच्‍या कलाविश्‍वाला ओहोटी लागली होती. सांस्‍कृतिक चळवळीला बळ द्यायच्‍या उद्देशाने श्‍याम पेठकर, नरेश गडेकर, राजेश चिटणीस अशा सर्वांनी एकत्र येऊन कट्टा सुरू करण्‍याची संकल्‍पना मांडली, असे विष्‍णू मनोहर म्‍हणाले.

मधूभैया जोशी यांनी जुन्‍या आठवणींना उजाळा दिला तर महेश पातुरकर यांनी धनवटे रंगमंदिराची आठवणी ताज्‍या केल्‍या. त्‍यावेळचे अनेक चेहरे आज येथे दिसत असून नागपुरी कलाकार कट्टाच्‍या माध्‍यमातून गाणे, संगीत, साहित्यिक क्षेत्रातील कलाकारांचा सुंदर संगम येथे बघायला मिळत असल्‍याबद्दल त्‍यांनी आनंद व्‍यक्‍त केला. त्‍यानंतर देवेंद्र दोडके यांनी स्‍वलिखित ‘बंधन’ या नाटकाचे नाट्यवाचन केले. विजय जथे यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.

4 ऑगस्‍ट रोजी भरणार कट्टा

नागपुरी कलाकार कट्टयावर दर महिन्‍याच्‍या एका रविवारी सर्व कलाकार एकत्र येणार आहेत. पुढील कट्टा रविवारी, 4 ऑगस्‍ट रोजी भरणार असून नागपुरातील कलाकारांनी मोठ्या संख्‍येने उपस्‍थ‍ित राहावे, असे आवाहन करण्‍यात आले आहे.

शहरात अनेक नाट्यसंस्‍था नाटक उभे करतात. पण त्‍यांना रंगीत तालीम करण्‍यासाठी जागाच मिळत नाही. ही अडचण आता दूर होणार असून विष्‍णुजी की रसोई येथील पहिल्‍या माळ्यावरील हॉलमध्‍ये नाटकांच्‍या रंगीत तालमींसाठी नि:शुल्‍क जागा उपलब्‍ध करून देण्‍यात येणार आहे. याशिवाय, विष्‍णुजी की रसोईच्‍या कंपाऊंडच्‍या भींतीवर नाट्यसंस्‍थांना त्‍यांच्‍या नाटकांचे प्रमोशनल पोस्‍टरदेखील लावू शकतील, असे नरेश गडेकर यांनी यावेळी जाहीर केले.

ज्‍येष्‍ठ रंगकर्मी मधूभय्या जोशी, महेश पातुरकर, राजेश चिटणीस, लेखक श्‍याम पेठकर, नरेश गडेकर, रुपाली मोरे, अविनाश सोनोने, देवेंद्र दोडके, महेश रायपूरकर, अभय अंजीकर, प्रफुल्‍ल माटेगावकर, अशोक जांभुळकर, नितीन पात्रीकर, अनिल इंदाणे, देवेंद्र लुटे, संजय पेंडसे, सारिका पेंडसे, शेखर मंगळमूर्ती, रविंद्र दुरुगकर, संजय वलीवकर, पराग लुले, रमेश भिसीकर, देवयानी जोशी, संजय भाकरे, विद्याधर जोशी, डॉ. गणेश वडोदकर, महेश गोडबोले, प्रशांद वालदे, वैदेशी चवरे, किशोर बत्‍तासे, डॉ. भाग्‍यश्री चिटणीस, निखिल टोंगळे, श्रद्धा तेलंग, कल्‍याणी गोखले, सुभाष डांगरे, अनिल चनाखेकर, राजेश तेलंग, निवेदक मुकुंद देशपांडे, प्रवीण मनोहर, डॉ. विजय मदनानी, मिलिंद देशकर, सचिन ग‍िरी, प्रशांत लिखार, सलीम शेख, अशोक आग्रे, हर्षाली काळीकर, गीता काळे, आसावरी तिडके, डॉ. प्रशांत भांडारकर, संजय पेंडसे, सरोज चौधरी, अनघा लिमये, श्‍याम पेठकर, श्‍वेता पेतकी, निता खोत, नरेश गडेकर, सुरेंद्र हरडे, दिपाली घोंगे, अनन्‍या बनसोड, अॅड अनंत गुलक्षे, यशवंत चोपडे, दिलीप मुळे, कॅलिग्राफी विनायक गवळी, राजीव चौधरी, ग्राफीक डिझायनर संजय वानखेडे, लेखक व दिग्‍दर्शक हर्षल सालपे, रांगोळी आर्टीस्‍ट निकीता हिरुळकर यांसह अनेक कलावंत यावेळी उपस्‍थ‍ित होते.

A boost to the cultural movement wikipedia
A boost to the cultural movement in india
A boost to the cultural movement pdf
A boost to the cultural movement notes
A boost to the cultural movement examples
Cultural movement examples
What happened during the Cultural Revolution
Cultural Revolution meaning