
(Sandip Joshi)संदीप जोशी (माजी महापौर , मानद सचिव उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य)
(Devendra Fadnavis)देवेंद्र फडणवीस
राजकारणातलं एक नावाजलेलं नाव…
शांत,संयमी,मृदूभाषी आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख असलेला देवेंद्र…!
मैत्री असो वा राजकारण त्याच्याजवळ कधीही मन मोकळं करता येतं आणि ते ही विश्वासानं.
कधीच कुणाला दुखावलं नाही तर कधी कुणाला कठोर शब्दांचा मारा केला नाही. पण त्याच्या कार्यप्रति तो अतिशय पक्का आहे. कुठलं काम जर नसेल झालं तर मग पुढल्यानं नक्कीच कठोर शब्दांचे वार झेलण्यास तयार राहावं. कुणाला मदत करायची झालीच तर मोठ्या मनानं तो मदत करेल आणि त्याचा कुठे गाजावाजा होणारही नाही. अत्यंत तल्लख बुद्धिमत्ता आणि बुद्धीचातुर्य मिळवलेला देवेंद्र (There is a strange chemistry in the politics of Maharashtra) महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक अजब रसायन आहे. बालपणापासूनच संघ, जनसंघाच्या संस्कारांचं बाळकडू त्याला मिळालं. स्वच्छ प्रतिमा,अभ्यासू वृत्ती, तरुण आणि तडफदार नेते म्हणून प्रसिद्ध असलेल्या देवेंद्रने वयाच्या २२ व्या वर्षी नगरसेवक, २४ व्या वर्षी भारतीय जनता पार्टी युवा मोर्च्याचं अध्यक्षपद, वयाच्या २७ व्या वर्षी महापौर, २९ व्या वर्षी आमदार आणि ते ही सलग पाच वेळा. वयाच्या ३१ व्या वर्षी राष्ट्रीय भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्च्याचं उपाध्यक्ष पद, ४३ व्या वर्षी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि वयाच्या ४४ व्या वर्षी (Chief Minister of Maharashtra State)महाराष्ट्र राज्याचं मुख्यमंत्री पद भूषवणारे
मा. देवेंद्र फडणवीस….!
हा प्रवास खरच इतका सोपा होता का? नक्कीच नाही. तरुणांची बेरोजगारी, ओबीसी विद्यार्थ्यांच्या क्रिमेलिअर किंवा शिष्यवृत्तीसाठी केलेली आंदोलने, श्री राम जन्मभूमीसाठी जेल मध्ये जाणंअसो वा हैद्राबाद येथील कत्तलखान्याच्या विरोधात केलेली आंदोलन असोत त्याने कायम जनतेच्या आणि देशाच्या हिताचाच विचार केला.
एक तरुण जेव्हा महाराष्ट्राची एवढी मोठी जबाबदारी स्वीकारतो तेव्हा तो सामान्य राहत नाही तर तो असामान्य होतो. भगवंताने त्याला असामान्य व्यक्तिमत्त्वाचा आशीर्वाद दिला आहेच. म्हणूनच कौतुक करताना मन मोठं असतं त्याचं आणि खडे बोल सुनावताना शब्द भंडार…!
अशा अद्वितीय व्यक्तिमत्त्वासोबत राहताना आपण एक सहकारी म्हणून तर मोठे होतोच पण एक व्यक्ती म्हणून समृद्ध होत जातो. त्यानं केलेल्या कार्याची महती आणि यादी सामान्य जनतेसाठी फार मोठी आणि मोलाची आहे. विरोधकांना भंडावून सोडणारा देवेंद्र…. इतिहास न बदलता इतिहासातून शिकून, नवे दाखले देऊन आपल्या कार्यकर्त्याला मोठं करणारा देवेंद्र….!
पक्षश्रेष्ठींनी दिलेला निर्णय “सर आँखो पर” म्हणत, एक पाऊल मागे घेणाराही देवेंद्रच….! पण ते पाऊलं मागे घेणं म्हणजे भविष्यात उंच झेप घेण्यासाठी….!
प्रयत्न, परिश्रम, संयम आणि अनुभवाच्या जोरावर आज तू इथवर पोहोचलायस भविष्यात खूप मोठी उंची तू गाठणार आहेसच.
मित्रा, आज तुला वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा….!
उदंड जग…..!