

नागपूर : प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सूचनेनसार राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शहर अध्यक्ष दूनेश्वर पेठे यांच्या नेतृत्वात व्हेरायटी चौक येथे शिंदे गटाविरोधात मंगळवारी गद्दार दिवस म्हणून निषेध आंदोलन करण्यात आला.
महाराष्ट्राशी गद्दारी करून गुवाहाटीला गेलेल्या शिंदे गटाविरोधात शिवसेना ठाकरे गटासोबतच अलीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. २० जून रोजी या गद्दारीला एक वर्ष पूर्ण झाले. या दिवशी झालेल्या सत्तांतराचा ‘गद्दार दिवस’ म्हणून निषेध व्यक्त करण्याचे . खोक्यांचे राजकारण करुन धोक्याने सत्ता बळकावलेल्या गद्दारांची सत्तेतून पायउतार व्हायची वेळ आली आहे. यासाठी गद्दारांचे डोके, खोक्यांनीच केले ओक्के, ही घोषणा राज्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत देत यानिमित्ताने या खोके सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष शेखर सावरबांधे, अफजल फारूक, महेंद्र भांगे आदी पदाधिकारी उपस्थित होते.