बबनराव तायवाडेंवर हिंगोलीत गुन्हा दाखल

0

हिंगोली : आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी ओबीसी नेते बबनराव तायवाडे (Babanrao Taywade) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. २६ नोव्हेंबर रोजी हिंगोली येथील रामलीला मैदानावरील वक्तव्य तायवाडे यांना भोवले असून त्यापायी हा गुन्हा दाखल झाला आहे.
जाहीरसभेत बोलताना तायवाडे यांनी “ओबीसींच्या विरोधात बोलणाऱ्यांचे हातपाय कलम करण्याची ताकद ठेवा”, असे वक्तव्य केले होते. त्यांनतर मराठा समाजाच्या (Maratha Reservation) वतीने तक्रार देण्यात आली होती. (Case Registered Against Babanrao Taywade) त्यानंतर बबनराव तायवाडे यांच्यावर हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.