दागिन्यांच्या सौंदर्याने लुभावणारे प्रदर्शन!

0

दागिन्यांच्या सौंदर्याने लुभावणारे प्रदर्शन! 

जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्सच्या भव्य दागिन्यांचे नागपुरात थाटात उद्घाटन

नागपूर : मुंबईतील सुप्रसिद्ध जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांच्या वतीने आयोजित भव्य दागिन्यांच्या प्रदर्शनाचे नागपूर येथे थाटात उद्घाटन करण्यात आले. दिनांक १९ जुलै रोजी सामाजिक कार्यकर्त्या वृंदा विकास ठाकरे, ओबीसी नेत्या निर्मला मानमोडे, निर्मल अर्बन बँकेच्या अध्यक्षा पूजा मानमोडे, भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा वैशाली चोपडे, सामाजिक कार्यकर्त्या आणि उद्योजिका चित्रा पराते यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले.

हे प्रदर्शन १९, २० व २१ जुलै या तीन दिवसांमध्ये हॉटेल सेंटर पॉइंट, रामदासपेठ, नागपूर येथे सकाळी १०.३० ते संध्याकाळी ८.३० या वेळेत खुले राहणार आहे.

या प्रदर्शनात शुद्ध सोने, चांदी आणि हिऱ्यांचे दागिने पाहणाऱ्यांचे विशेष लक्ष वेधून घेत आहेत. विशेष म्हणजे, “Amalia – The Eternal Shine” या नव्या ब्रँड कलेक्शनचे हे पहिलेच सादरीकरण आहे, ज्यामध्ये केवळ ₹४००० पासून हिऱ्याचे दागिने उपलब्ध आहेत. तसेच, “You ‘N’ Me Collection” अंतर्गत ९२५ सिल्व्हर ज्वेलरी ₹५०० पासून विक्रीसाठी उपलब्ध असून, हे दागिने दैनंदिन वापर आणि गिफ्टिंगसाठी योग्य ठरतील.

या भव्य प्रदर्शनाला विविध क्षेत्रातील महिलांनी भेट देत शुभेच्छा दिल्या. यावेळी अदिती श्रीवास्तव, सुरेखा चौधरी, रिंकू घोष, धनश्री मते, प्रीती तायडे, ममता डुकरे यांचीही उपस्थिती होती. यावेळी सर्व मान्यवरांचे योगेश पेडणेकर,प्रदर्शन प्रमुख सागर हळदणकर व राजेश सोनटक्के यांनी स्वागत केले.

सोमवार, २१ जुलै हा प्रदर्शनाचा शेवटचा दिवस असून, दर्जेदार दागिन्यांचा आणि विश्‍वासार्हतेचा अनुभव घेण्यासाठी नागपूरकरांनी या प्रदर्शनाला अवश्य भेट द्यावी, असे आवाहन आयोजक आसावरी पेडणेकर यांनी केले आहे.