गनपावडर कारखान्यात स्फोट; कामगारांच्या किंचाळ्या; 12 जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता

0

Breaking News | Shankhnnad Live News

Chhattisgarh :   बेमेतरा जिल्ह्यात गनपावडरच्या कारखान्यात मोठा स्फोट झाला आहे. या स्फोटात 10 ते 12 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. ढिगाऱ्याखाली अनेक लोक दबले गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे. बर्ला ब्लॉकच्या बोरसी गावात असलेल्या स्पेशल ब्लास्ट लिमिटेड गनपावडर कारखान्यात ही घटना घडली. कारखान्यात 800 हून अधिक लोक काम करतात. (Chhattisgarh Factory Blast) घटनास्थळी पोलीस, अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. वाऱ्याच्या वेगाने या कारखान्यात बचावकार्य सुरू आहे.

सकाळी 6 ते 7 च्या दरम्यान हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. स्फोटानंतर कारखान्याभोवती लोकांची गर्दी झाली आहे. 7 जणांना रायपूरच्या मेहकरा रुग्णालयात आणण्यात आले असून त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे. तेथे सहा जणांवर उपचार सुरू आहेत. याशिवाय अनेकांना रायपूर एम्स आणि जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

अनेकांच्या शरीराचे तुकडे झाले
या स्फोटात 10-12 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. अनेक लोकांच्या मृतदेहाचे तुकडे झाल्याचे सांगण्यात येत आहे. कुणाचा हात कापला गेला, कुणाच्या शरीराचे तुकडे झाले. आजूबाजूला मानवी अवयव पसरल्याचे स्थानिकांनी सांगितले.

 

A blast at the biggest explosives factory in Chhattisgarh’s Bemetara district injured six labourers, leaving a 20 feet crater on the ground and a potential for double-digit deaths.

गनपावडर कारखान्यात स्फोट;10-12 जणांचा मृत्यू?

ढिगाऱ्याखाली अनेक लोक दबले गेल्याची शक्यता

छत्तीसगडमधील बेमेतरा जिल्ह्यात गनपावडरच्या कारखान्यात मोठा स्फोट झाला आहे. या स्फोटात 10 ते 12 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. ढिगाऱ्याखाली अनेक लोक दबले गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे. बर्ला ब्लॉकच्या बोरसी गावात असलेल्या स्पेशल ब्लास्ट लिमिटेड गनपावडर कारखान्यात ही घटना घडली. कारखान्यात 800 हून अधिक लोक काम करतात. सकाळी 6 ते 7 च्या दरम्यान हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. स्फोटानंतर कारखान्याभोवती लोकांची गर्दी झाली आहे. 7 जणांना रायपूरच्या मेहकरा रुग्णालयात आणण्यात आले असून त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे. तेथे सहा जणांवर उपचार सुरू आहेत. याशिवाय अनेकांना रायपूर एम्स आणि जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
—————-

आजपासून नवतप सुरु
6 राज्यांत उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट

नवतपा आजपासून सुरू झाला आहे. 2 जूनपर्यंत चालणार आहे. या काळात देशाच्या काही भागांत तापमान 49 अंश सेल्सिअसपर्यंत जाऊ शकते. हवामान खात्याने शनिवारी दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, पंजाब आणि हरियाणामध्ये उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट जारी केला आहे.
शुक्रवारी उत्तर भारतात कमाल तापमान 49 आणि किमान 31 अंश सेल्सिअस होते. राजस्थानमध्ये उष्णतेमुळे 5 जणांचा मृत्यू झाला आहे. अशाप्रकारे दोन दिवसांत राज्यातील मृतांची संख्या 13 झाली आहे.
दुसरीकडे काश्मीर खोऱ्यात तापमानात वाढ झाली आहे. श्रीनगर हवामान विभागाने सांगितले की, 23 मे रोजी कमाल तापमान 32.2 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. हा 11 वर्षांतील उच्चांक होता. 25 मे 2013 रोजी ते 32.2 अंश सेल्सिअस होते.
———-

मित्रानेच केला मित्राचा चाकूने भोसकून खून
दारूच्या नशेत शिवीगाळ जीवावर बेतली
दारूच्या नशेत करण्यात आलेली शिवीगाळ तरुणाच्या जीवावर बेतली आहे. क्षुल्लक कारणातून चाकूने भोसकून मित्राचा खून करणाऱ्या आरोपीला गोंदिया पोलिसांनी अटक केली आहे. राहुलचा खून केल्यानंतर आरोपी प्रतीक पसार झाला होता. त्याच्या शोधासाठी शहर पोलिस ठाण्यातील तीन पथके तर स्थानिक गुन्हे शाखेची दोन पथके अशी पाच पथके तयार करण्यात आली. पथकाकडून प्रतीकची मित्रमंडळी व नातेवाइकांकडे शोध घेण्यात आला. शिवाय पथक भंडारा, नागपूर, बालाघाट येथे रवाना करण्यात आले होते. पथकांकडून अथक प्रयत्न करून व मोठ्या शिताफीने प्रतीक भोयर याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे.
———-

पुणे हिट अँड रनप्रकरणी आरोपीच्या आजोबास अटक
ड्रायव्हरला डांबून ठेवल्याचा गंभीर आरोप

पुणे हिट अँड रनप्रकरणी कार अपघातातील अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांना अटक करण्यात आली आहे. अपघातानंतर आरोपीसोबत असलेल्या ड्रायव्हरला डांबून ठेवल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. याप्रकरणाचा तपास शुक्रवारी आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे.

—————
लाकडाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई

मध्यप्रदेश राज्यातून महाराष्ट्रात तस्करी
महाराष्ट्र मध्य प्रदेश राज्याच्या सीमावर्ती जंगलात खैर जातीच्या वृक्षांची अवैध वृक्षतोड करून वनविभागाला हुलकावणी देत मध्य प्रदेशातील खैर जातीच्या लाकडांची महाराष्ट्रात तस्करी करीत आहेत. मध्य प्रदेशातील जंगलातील खैर जातीच्या लाकडांची विना परवाना अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर व चालकांवर सिहोरा पोलिसात गुन्हा दाखल करून ट्रॅक्टर व ट्रॅक्टरमधील खैर जातीचे सुमारे चार टन लाकूड जप्त करण्यात आले. अंदाजे तीन लाख ३६ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला.वाहन चालक यश शरणागत (२१, खैरी ता. खैरलांजी, जिल्हा बालाघाट) याला अटक करण्यात आली आहे.
——–

अकोल्यात शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न
शेतीचा ताबा घेण्याच्या वादामधून सावकाराचा हल्ला

अकोला जिल्ह्यात सावकाराकडून तरुणाला ट्रॅक्टरच्या चाकाखाली चिरडण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सावकाराला शेतीचा ताबा घेण्यास विरोध करणाऱ्या शेतकऱ्याला ट्रॅक्टरच्या चाकाखाली चिरडण्याचा प्रयत्न सावकार आणि त्याच्या सहकाऱ्यांनी केला आहे.

न्यायाधीशांच्या घरी चोरट्यांनी मारला डल्ला
परदेशी चलनाबरोबरच दागिने लांबवले

न्यायाधीशांच्या घरी चोरी झाल्याची धक्कादायक घटना चंद्रपुरात उघडकीस आली आहे. वरोरा शहरात राहणारे न्यायाधीश बाहेर गावी गेले होते. घरात कुणी नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी डाव साधला. यावेळी चोरट्यांनी सोने, चांदी रोख रक्कम असा हजारो रुपयाचा ऐवज लंपास केला. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जावून चौकशी केली शिवाय पुढील तपासही सुरू केला आहे.