काँग्रेसच्या रश्मी बर्वे यांना मोठा धक्का

0

सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली 

काँग्रेसच्या रामटेकच्या उमेदवार रश्मी बर्वे यांना सुप्रीम कोर्टाकडूनही दिलासा मिळालेला नाही. रश्मी बर्वे यांचं जातप्रमाणपत्र रद्द झाल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला. रश्मी बर्वे यांचा लोकसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज रद्द करण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्याची विनंती मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळली होती. मात्र आता बर्वे यांची ही याचिका देखील सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे बर्वे यांच्या अडचणींमध्ये वाढ होणार आहे. रामटेक ही जागा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. काँग्रेसकडून या मतदारसंघातून रश्मी बर्वे यांना उमेदवारी जाहीर झाली होती. पण रश्मी बर्वे यांचं जातप्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र हे जात पडताळणी समितीने रद्द केलं. त्यामुळे त्यांच्याजागेवर त्याचे पती श्यामकुमार बर्वे यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे.