यवतमाळ येथे अ भा बंजारा साहित्य संमेलनाचे आयोजन

0

पोहरादेवी (Poharadevi) : ऑल इंडिया बंजारा सेवा संघ, महाराष्ट्र कवी व गायक संघ आर्णी, आणि बंजारा साहित्य अकॅडमी भारत यांच्या संयुक्त विद्यमाने माहे मे महिन्यात यवतमाळ येथे अखिल भारतीय बंजारा साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे या संमेलनाचे आयोजन तथा महाराष्ट्र बंजारा कवी व गायक संघचे राष्ट्रीय अध्यक्ष राजूदास जाधव आणि बंजारा साहित्य अकॅडमीचे अध्यक्ष शंकर आडे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

गेल्या वर्षी काही कारणास्तव हे संमेलनाचे स्थगित झाले होते. हे अखिल भारतीय साहित्य बंजारा संमेलन आता माहे मे महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात होणार असल्याचे आयोजकानी म्हटले आहे. या संमेलनात महाराष्ट्र राज्याचे मृदू व जलसंधारण मंत्री संजयभाऊ राठोड, राज्य मंत्री इंद्रणिल नाईक, आमदार महंत बाबुसिंग महाराज,ऑल इंडिया बंजारा सेवा संघांचे प्रभारी अध्यक्ष डॉ टी सी राठोड, आमदार राजेश राठोड, आमदार डॉ तुषार राठोड, वसंतराव नाईक महामंडळाचे अध्यक्ष तथा माजी आमदार निलयभाऊ नाईक , सह देशातील अनेक मान्यवराना निमंत्रीत करण्यात येणार आहे. तसेच या संमेलणासाठी देशभरातून अनेक साहित्यिक, कवी आणि विचारवंत हजेरी लावणार आहे.

या संदर्भात जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात यवतमाळ येथे सर्व समावेशक बैठक होणार आहे. अखिल भारतीय बंजारा साहित्य संमेलन हे बंजारा समाजासाठी अनेक दृष्टीन फायद्याचे ठरणार आहे. बंजारा भाषा, संस्कृती , बंजारा इतिहास याला उजाळा मिळणार आहे. तसेच या अति प्राचीन बंजारा संस्कृतिचा अभ्यास करण्याची सुवर्ण संधी इतर भाषिक अभ्यासकाना या संमेलणामुळे मिळणार आहे.

हे संमेलन देशातील बंजारा साहित्यिकांना एकमेकांशी संवाद साधण्याची, आपली कला आणि संस्कृती सामायिक करण्याची संधी देणार आहे . यामुळे बंजारा साहित्याला नवीन उंची गाठण्यास मदत मिळते.
हे संमेलन समाज जागृतीसह बंजारा समाजातील सामाजिक समस्यांवर चर्चा करण्याचे आणि त्यांच्या निराकरणासाठी उपाय शोधण्याचे एक साधन बनेल. तसेच सामाजिक, सांस्कृतिक दर्शन घडवणारे ठरेल असे प्रतिपादन आयोजक श्री राजूदास जाधव यांनी केले.

.