अमरावती जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी आ बच्चू कडू यांची निवड

0

 

अमरावती -जिल्ह्यातील शेतकऱ्यांची नाडी समजल्या जाणारी अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेत काँग्रेसचे संख्या बळ जास्त असून सुद्धा माजी मंत्री बच्चू कडू यांनी यशस्वी खेळी खेळत काँग्रेसची तीन मते आपल्याकडे वळवत अध्यक्षपद खेचून आणले. बच्चू कडू गटातर्फे आ बच्चू कडू स्वतः अध्यक्षपदासाठी तर सहकारा नेते अभिजीत ढेपे हे उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक रिंगणात होते. बच्चू कडू व अभिजीत ढेपे या दोघांनाही 11-11 मते मिळाली. काँग्रेसच्या यशोमती ठाकूर व बबलू देशमुख गटाचे उमेदवार माजी आ. वीरेंद्र जगताप व हरिभाऊ मोहोळ या दोघांनाही दहा दहा मते मिळाली. काँग्रेसची या निवडणुकीत तीन मते फुटून ती बच्चू कडू यांच्याकडे गेली. आमदार यशोमती ठाकूर यांच्या गटाला हा धक्का असल्याचे बोलले जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हा बँकेवर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांची एक हाती सत्ता होती. शेतकऱ्यांना व संचालकांना त्रास देणाऱ्या हुकूम शहांची हुकूमशाही संपवली व जिल्हा बँक शेतकऱ्यांच्या दारी घेऊन जाणार अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली.