सेवानिवृत्त शिक्षकांचे समस्यांचा आ.अडबाले यांनी घेतला आढावा

0

वित्त अधीकारी, शिक्षणाधिकारी सभेला उपस्थिती

नागपूर (Nagpur) -सेवानिवृत्त शिक्षकांचे समस्या सोडविण्यासाठी शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांचे उपस्थितीत शिक्षणाधिकारी (प्राथ), वित्त अधिकारी, उपमुख्यकार्यकारी अधिकारी, संबंधित अधिकारी व लिपीक वर्ग,सर्व तालुका गटशिक्षणाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी सर्व से. नि. शि. संघटना यांचे अनेक प्रश्न होते. सलग 5ते 6 तास चालेल्या सभेत अनेक समस्या सोडविण्यात यश आले. सभेला जिल्हा पदधिकारी दगडे सर, सचिव दीपक सावळीकर, राज्य प्रतिनिधी विनोद राऊत सह महासभेचे कार्यकारिणीचे सदस्यांनी योग्य भूमिका पार पाडली. निवारण सभा आयोजन खेडकर सभागृह जि. प. नागपूर येथे करण्यात आले होते. जिल्ह्यातील सर्व तालुक्यातुन प्रतिनिधी व समस्या असणारे तक्रारकर्ते उपस्थित होते.

शिक्षकांचे समस्या सोडविण्यासाठी मला अशी संधी दिल्यास आनंद होईल असे आमदार सुधाकर अडबाले यांनी मार्गदर्शनात मत मांडले. एखाद्या पेन्शन अदालती ला मला आवर्जुन बोलवा . पेन्शन अदालतीचे कार्य कसे चालते हे मला बघायचे आहे असे अडबाले संघटनेशी बोलतांना सहकार्याची भावना व्यक्त केली.सांगितले. सहकार्याबद्दल महासंघांचे पदाधिकाऱ्यांनी सर्वांचे आभार मानले.