केदारांच्या जामीनावर सुनावणीसाठी ही तारीख ठरली!

0

नागपूर  NAGPUR  : नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळा प्रकरणी शिक्षा ठोठावण्यात आलेले काँग्रेस नेते सुनील केदार (Sunil Kedar Bail Case) यांच्या जामीन अर्जावर बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला नोटीस बजावत ६ जानेवारीपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. आता या प्रकरणातील सुनावणी ९ जानेवारीला होणार आहे.
नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील दिडशे कोटी रुपयांच्या घोटाळ्यात अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी २२ डिसेंबर रोजी केदार यांना दोषी ठरवत पाच वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. सत्र न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळल्यावर केदार यांच्या वकिलांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावर आज उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने हे आदेश दिले आहे. राज्य सरकारकडून उच्च न्यायालयात उत्तर सादर झाल्यावर ९ जानेवारी रोजी केदार यांच्या जामीनावर सुनावणी होऊ शकणार आहे. तोवर केदार यांचा मुक्काम कारागृहातच राहणार आहे.
सत्र न्यायालयाने यापूर्वीच त्यांच्या शिक्षेस स्थगिती देण्यास कोर्टाने नकार दिला आहे.