

ठाणे(Thane), 1 जून, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अभियान अंतर्गत प्रत्येक महिन्यात आनंददायी निवृत्ती वेतन योजना राबविण्यात येत आहे या अनुषंगाने आज सेवानिवृत्त होत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान सोहळा पार पडला. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक छायादेवी शिसोदे यांच्या शुभहस्ते ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील उप अभियंता (यांत्रिकी) हणमंत आकाराम कदम, आरोग्य विभागातील आरोग्य सहाय्यक ज्ञानेश्वर पंडित थटार यांचा सन्मान करण्यात आला. तसेच आज जिल्हा परिषदेचे एकूण ८१ अधिकारी व कर्मचारी सेवानिवृत्त झाले.
या प्रसंगी मार्गदर्शन करताना मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सर्व सेवावृत्त होणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांना शुभेच्छा दिल्या. जिल्हा परिषदेच्या सेवेबाबत त्यांचे अभिनंदन करण्यात आले. त्यांच्या भावी आयुष्याकरिता शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रुपाली सातपुते, ग्रामपंचायत विभाग प्रमुख उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे, पाणी पुरवठा विभाग प्रमुख प्रदिप कुलकर्णी तसेच सर्व जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
शिक्षण विभाग प्राथमिक ४६, सामान्य प्रशासन १०, महिला व बालकल्याण १, ग्रामपंचायत विभाग ४, आरोग्य विभाग ८, बांधकाम विभाग ११, पशुसंवर्धन विभाग १ असे एकूण ८१ अधिकारी व कर्मचारी आज सेवानिवृत्त झाले आहेत. उपअभियंता (यांत्रिकी), विस्तार अधिकारी शिक्षण, मुख्याध्यापक, प्राथमिक शिक्षक, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सहाय्यीका, ग्रामसेवक, शिपाई, सफाई कामगार या पदावरील अधिकारी व कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहे.