रुग्णांची ७५ वी तुकडी विविध आजारांच्या शस्त्रक्रियेसाठी रवाना

0

 

आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्राचा उपक्रम

घुग्घुस (Ghugghus) :- येथील आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र आणि आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार आरोग्य सेवा समिती महाराष्ट्रातर्फे १३ ऑगस्ट रोजी दुपारी या सेवा केंद्रातून भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांच्या मार्गदर्शनात विविध आजारांच्या शस्त्रक्रियेसाठी रुग्णांची ७५ वी तुकडी रवाना करण्यात आली.

सर्वांची मोफत शस्त्रक्रिया आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार (Sudhirbhau Mungantiwar) आरोग्य सेवा समिती महाराष्ट्र करणार आहे. नुकतेच आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त घुग्घुस शहरात भव्य महाआरोग्य शिबीर पार पडले या शिबीरात रुग्णांची नि:शुल्क तपासणी करण्यात आली यातील पात्र रुग्णांना विविध आजारांच्या शस्त्रक्रियेसाठी आचार्य विनोबा भावे (सावंगी मेघे) रुग्णालयात पाठविण्यात आले.

यावेळी भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे, नकोड्याचे सरपंच किरण बांदूरकर, भाजपा नेते प्रमोद भोस्कर, आकाश निभ्रड, बबलू सातपुते, असगर खान, तुलसीदास ढवस, धनराज पारखी, महेंद्र मेश्राम, हेमंत कुमार, सुरेंद्र जोगी, दीपक अनेजा, योगेश भोंगळे, अशोक भोंगळे, अमोल रेगुंडवार, उमेश दडमल, संदीप तेलंग, हनुमान खडसे, सुनंदा लिहीतकर आदी उपस्थित होते.