
गोंदिया- जिल्ह्यात अपेक्षित पावसाच्या तुलनेत सध्या 109 टक्के पाऊस आतापर्यंत झालेला आहे. आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये गेल्या चार महिन्यांपासून पाऊस पडत आहे. त्या तुलनेत आतापर्यंत 39 % पाऊस पडलेला आहे. सध्या जिल्ह्यात 41 टक्के पासून 73 टक्के जलसाठा 73 टक्क्यांपर्यंत आहे. सध्या जिल्हात पूर परिस्थिती नाही. मात्र, विस्कळीत रित्या जिल्ह्यात पाऊस पडत आहे. त्यामुळे वारंवार जनतेला हे आवाहन करत असून नदी पात्रात जाऊ नये, सोबतच वाहतूक किंवा अवजार वगैरे घेऊन जाऊ नये, तसेच जिल्हाधिकारी यांनी युवकांना विनंती केली आहे की, पाऊस एन्जॉय करा पण सेल्फी चा नाद करू नये. स्वतःच्या जीवाची त्यांनी काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे.