“७० हजार कोटींचा मलिदा खाणारे..”, वडेट्टीवारांची टीका

0

चंद्रपूर- ७० हजार कोटींचा मलिदा खाणारे आज सत्ताधाऱ्यांच्या मांडीवर बसून पोपटासारखे बोलत असल्याची टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर केली. एका कार्यक्रमात बोलताना वडेट्टीवार यांची जिभ घसरली. ७० हजार कोटी खाल्लेला बारामतीचा पोपट बनला आहे. महाराष्ट्र सदन बांधला सुंदर आणि भुजबळ गेला अंदर, भ्रष्टाचाराच्या आरोपात अंदर झालेले आता बंदर बनून मांडीवर बसले आहेत. मांडीवर बसलेले हे बंदर आता पोपट बनून बोलायला लागले आहेत, असेही वडेट्टीवार म्हणाले. वडेट्टीवार म्हणाले, खासदारांची स्थिती गुलामासारखी झाली आहे. ते काहीच बोलू शकत नाही, अशी टीकाही त्यांनी केली.