मुंबई : MUMBAI मुंबईच्या गोरेगाव परिसरातील एका इमारतीच्या पार्किंगमध्ये भीषण आग लागून सात जणांचा होरपळून मृत्यू झाला तर पाच जण गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास ही आग लागल्याची माहिती असून अग्निशमन दल आणि पोलिसांना आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे. CM मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आगीत मृत्यू झालेल्यांच्या वारसांना आर्थिक मदत जाहीर केली आहे.
ही आग नेमकी कशी लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी साठवून ठेवलेल्या भंगारामुळे ही आग लागली असावी, असा एक अंदाज आहे. मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत केली जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांकडून झाली आहे. तर जखमींच्या उपचारांचा खर्चही राज्य सरकार करणार आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
Related posts:
म.न.पामध्ये मोठा घोटाळा! निवासी भूखंडावर बहुमजली हॉस्पिटलचे बांधकाम मंजूर
October 31, 2025Breaking news
रेलवे पुलिस की तत्परता से महिला यात्री को मिला खोया हुआ बैग
October 25, 2025MAHARASHTRA
कळमेश्वर गोंडखैरी उड्डाणपूलास मंजुरी-डॉ. राजीव पोतदार यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश
October 23, 2025MAHARASHTRA
















