
चंद्रपूर :- महाराष्ट्र बॉल बॅडमिंटन असोसिएशन व चंद्रपूर बॉल-बॅडमिंटन डेव्हलपमेंट असोसिएशनच्या वतीने आयोजित ६९ वी वरीष्ठ गट राज्यस्तरीय बॉल बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा (महिला व पुरुष) दिनांक ११ ते १४ सप्टेंबर २०२५ दरम्यान आनंद निकेतन महाविद्यालयाचे पटांगण, आनंदवन येथे पार पडली. राज्यभरातून तब्बल ६०० खेळाडूंनी सहभाग घेतला.
स्पर्धेचे उद्घाटन १२ सप्टेंबर रोजी प्राचार्य डॉ. मृणाल काळे यांच्या हस्ते झाले. यावेळी महाराष्ट्र बॉल बॅडमिंटन असोसिएशनचे श्री. गोसावी, श्री. इंगळे, श्री. पवार, श्री. काळे, श्री. संजय ढवस, प्रा. रवी झाडे, डॉ. विजय हेलवटे, श्री. दिलीप मोरे, तसेच विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हा कोषाध्यक्ष श्री. नितीन जीवतोडे, वरोरा तालुका अध्यक्ष श्री. दिलीप भरडे, कार्यवाह श्री. माधव चाफले, चंद्रपूर बॉल-बॅडमिंटन डेव्हलपमेंट असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अजय वासाडे, सचिव प्रकाश सातपैसे आदी मान्यवर उपस्थित होते.
🏆 विजेते संघ
पुरुष गट :
प्रथम – लातूर जिल्हा
द्वितीय – पुणे महानगर
तृतीय – अमरावती
चतुर्थ – पुणे जिल्हा
महिला गट :
प्रथम – पुणे
द्वितीय – पुणे महानगर
तृतीय – रायगड
चतुर्थ – हिंगोली
स्पर्धेत विजेत्या महिला व पुरुष संघांना ट्रॉफी व प्रमाणपत्र प्रदान करून गौरविण्यात आले. बक्षीस वितरण सोहळ्यात आमदार सुधाकर अडबाले यांनी सर्व विजेते, खेळाडू, प्रशिक्षक, पंच व आयोजकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.