

नागपूर (Nagpur)महानगरपालिकेद्वारे कुष्ठरोग जनजागृती अभियानांतर्गत कुष्ठरोग मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. यात राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयाच्या 60 विद्यार्थ्यांनी सहभागी होत जनजागृती केली.
बाबा भीमराव आंबेडकर हॉस्टिटल इंदौरा येथून सुरू झालेल्या मॅरेथॉन चा तिरपुड़े नर्सिंग कॉलेज येथे समारोप झाला. राष्ट्रीय अग्निशमन सुरक्षा महाविद्यालयाचे एलएफएम आर.एम. सबनीस व संचालकांचे सहायक अविनाश सिंह यांच्या मार्गदर्शनात बी.टेक.
फायर इंजीनियरिंगच्या या विद्यार्थ्यांनी उत्साहात मॅरेथॉन पूर्ण केली. स्पर्श मोहिमेअंतर्गत या मॅरेथॉनमध्ये अनेक डॉक्टर सहभागी झाले होते. डॉ. शाजिया शेम्स मेडिकल अधिकारी एन.एम.सी. क्रमांक 1 द्वारा संचालित ही मॅरेथॉन यशस्वीरित्या संपन्न झाली.