
छत्रपती संभाजीनगर – छत्रपती संभाजी नगर वाळुज एमआयडीसीतील सनशाइन इंटरप्राईजेस या कंपनीला शनिवारी रात्री भीषण आग लागली.या कंपनीमध्ये रात्री १३ कामगार काम करत होते. या आगीमध्ये सहा कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती डीसीपी नितीन बगाटे यांनी दिली आहे. काही कामगारांनी झाडावरून उड्या मारुन आपला जीव वाचवला असल्याचे कामगारांनी प्रत्यक्ष सांगितले.दरम्यान, पालकमंत्री संदिपान भुमरे यांची घटनास्थळी पाहणी केली. ही कंपनी रबरी हातमोजे बनविण्याचे काम करते. या आगीमध्ये सहा परप्रांतीय मंजुराचा मृत्यू झाला. ही आग कशामुळे लागली यांची चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करण्याचे आदेश देखील पालकमंत्री संदिपान भूमरे यांनी दिले आहेत.