‘50 गोल्‍डन रुल्‍स ऑफ लाईफ’ 1 डिसेंबर रोजी प्रकाशन

0

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची उपस्‍थ‍िती 

एम्बेसी बुक्स आणि क्रॉसवर्ड बुकस्टोअर्स यांच्या संयुक्त विद्यमाने प्रसिद्ध लेखक संतोष जोशी यांच्या ’50 गोल्डन रूल्स ऑफ लाइफ’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रविवार, 1 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 6 वाजता आयोज‍ित करण्‍यात आला आहे. क्रॉसवर्ड बुकस्टोअर्स, जायका बिल्डिंग, सिव्हिल लाइन्स, नागपूर येथे होणा-या या कार्यक्रमात मा.श्री. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्‍या हस्‍ते पुस्‍तकाचे प्रकाशन होईल. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे माजी माहिती आयुक्त राहुल पांडे उपस्थित राहणार आहेत.

‘50 गोल्‍डन रुल्‍स ऑफ लाईफ’ हे पुस्‍तक व्यक्तींना संतुलित आणि परिपूर्ण जीवनाकडे नेण्‍यासंदर्भात मार्गदर्शन करणारे असून ते व्यावहारिक आणि तत्त्वज्ञानात्मक तत्त्वांचा शोध घेते. आधुनिक जीवनातील गुंतागुंतीवर मात करताना कालातीत मूल्ये आत्मसात करण्याची प्रेरणा हे पुस्तक वाचकांना देते, असे लेखक संतोष जोशी म्‍हणाले.