
नागपूर Nagpur -मित्रांसोबत मौजमजा करायला मोहंगाव झिल्पि तलावावर आलेल्या ६ मित्रांपैकी पाच तरुणाचा पाण्यात बुडुन मृत्यू झाला. ही घटना रविवारी सायंकाळी घडली. स्थानिक पोहणाऱ्यांच्या मदतीने रात्री हिंगणा पोलिसांनी पाचही मृतदेह बाहेर काढले.Among the dead are 1( Rishikesh Parale 21, Vathoda, Nagpur, 2) Rahul Meshram 23, Giddoba Mandir Chowk, Vathoda, Nagpur, 3) Vaibhav Bhageshwar Vaidya, 24, Bhandewadi Road, Pardi, Nagpur, 4) Shantanu (full name not available) Age 23)Xray Assistant मृतकांमध्ये १( ऋषिकेश पराळे 21 ,वाठोडा,नागपूर,२)राहुल मेश्राम 23,गिडडोबा मंदिर चौक, वाठोडा ,नागपूर,३)वैभव भागेश्वर वैद्य,24,भांडेवाडी रोड, पारडी,नागपूर,४) शंतनू (पूर्ण नाव मिळाले नाही)( वय२३)एक्सरे असिस्टंट व (एका मयताची ओळख पटु शकली नाही )अशी मृतकाची नावे असून हे सर्व पूर्व नागपूर भागातील रहिवासी आहेत.5 youth died after drowning in Mohgaon Zilpi lake
रविवारी सुट्टी असल्याने ऋषिकेश पराळे त्याचा घराशेजारी राहणाऱ्या तीन मित्रांसोबत तो तालुक्यातील मोहंगाव झिल्पि तलावावर आला होता. तिथे मौजमजा करीत असताना डॉक्टर प्राजक्त मोरेश्वर लेंडे,32 ,रमना मारोती चौक,नागपूर यानी फोन केला तेव्हा मी मित्रांसोबत तलावावर फिरायला आलो आहे तुम्ही पण या असे सांगितल्याने डॉ प्राजक्त सुद्धावैभव वैद्य सोबत कार क्र एम एच ४९ बी के ५५०१ ने तिथे पोहचले. डॉ प्राजक्त कारजवळ थांबले होते.काही वेळाने उर्वरित चार जण पाण्यात पोहण्यासाठी तलावात उतरले. सर्व खोल पाण्यात गेल्याने गटांगळ्या खाऊ लागले. याचवेळी काठावर असलेले दोघे मदतीला गेले ते सुद्धा बुडाले.
इकडे डॉ प्राजक्त मदतीला जाण्याच्या आतच पाचही जण बुडाले. त्यामुळे डॉक्टरने आरडाओरड केली पण कुणीही त्यांना वाचवू शकले नाही. पोलीस नियंत्रण कक्षा मोबाईलवर याची माहिती देण्यात आली हिंगणा पोलिसांना माहिती मिळताच ठाणेदार विशाल काळे, पोलिस निरीक्षक गोकुळ महाजन, पो नि दत्ता वाघ व स्टाफ घटनास्थळी दाखल झाले.पोलिसांनी तात्काळ गावातील पट्टीचे पोहणारे रेखराम भोंडे, शंकर मोरे यांच्या मदतीने मृतदेह शोध मोहीम सुरू केली व रात्री ७:३० च्या सुमारास सर्व पाचही मृतदेह बाहेर काढले व उत्तरीय तपासणीसाठी हिंगणा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. घटनास्थळी तहसीलदार प्रियदर्शिनी बोरकर, सहायक पोलीस आयुक्त प्रवीण तेजाळे, तलाठी ऋतुजा मोहिते हे सुद्धा घटनास्थळी दाखल झाले होते. हिंगणा पोलिसांनी नागपूर महानगरपालिका येथून अग्निशमन दलाच्या जवानांना सुद्धा मृतदेह बाहेर काढण्यासाठी बोलावले होते.