47 विद्यार्थिनी उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल

0

 

(Bhandara)भंडारा – नर्सिंगचे प्रशिक्षण घेणाऱ्या भंडारा येथील एएनएमच्या 47 विद्यार्थिनींची अचानक प्रकृती बिघडल्यानं त्यांना भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. विद्यार्थिनींवर उपचार करून मलेरिया आणि डेंग्यू आजाराबाबत रक्तनमुने घेण्यात आलेत. आज सकाळी प्रकृती सुधारणा झाल्यानं 40 विद्यार्थ्यांना सुट्टी देण्यात आली आहे. सात विद्यार्थिनींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

शासकीय नर्सिंग महाविद्यालयाच्या वस्तीगृहातील या विद्यार्थिनी असून त्यांना देण्यात येणाऱ्या भोजनातून विषबाधा झाल्याचा संशय विद्यार्थिनींच्या पालकांनी व्यक्त केली. दरम्यान, या विद्यार्थिनींचे रक्तनमुने तपासणी करण्यात आली असून त्यात काय आढळून येते? याचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. दरम्यान, या सर्व विद्यार्थिनींना विषबाधा नव्हे तर, सर्वांना ताप आणि मळमळ अशी लक्षणे आढळून आल्याने त्यांची प्रकृती बिघडल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दीपचंद सोयाम यांनी दिली.