

बापट नगर येथील नागरिकांसाठी पोलट्रीट लाईट उपलब्ध करून द्या
जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके यांचा इशारा
चंद्रपुर : शहरातील प्रभाग क्रमांक 14 बापट नगर नागपूर रोड हॉटेल सीतारा अपोजिट राजनूर इंफेक्स या भागात अनेक वर्षापासून पोल मंजूर करण्यासाठी येथील नागरिकांनी अनेक निवेदन दिली परंतु अजून सुद्धा या भागातील नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे .
विद्यार्थी ट्युशनला ये जा करण्यासाठी रात्री त्यांना अंधारातून जाण्यासाठी त्रास होतो. या वार्डात जवळूनच रेल्वे लाईन असल्याने रात्रीच्या वेळेस मोठे मोठे साप या क्षेत्रात फिरत असतात .त्यामुळे नागरिकांचे जीव सुद्धा जाऊ शकतात किंवा अशा अंधारात कोणत्याही प्रकारच्या घटना होण्यास नाकारू शकत नाही .6 इलेक्ट्रिकल पोल मंजूर करून बापटनगर येथील नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी महानगरपालिका आयुक्त. विपिन पालीवाल यांची भेट घेऊन नागरिकांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी निवेदन दिले. आठ दिवसात जर पोल,ट्रिटलाईट बापट नगरला लावण्यात आले नाही.तर आम्ही महानगरपालिकेच्या समोर सर्व नागरिकांना घेऊन आंदोलन करण्यात येईल असा इशारा शहर जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके यांनी दिला. यावेळी उपस्थित जिल्हा कार्याध्यक्ष संजय ठाकूर, शहर जिल्हाध्यक्ष कलाकार मल्हारप, विधानसभा अध्यक्ष सुरज चव्हाण , जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पूजा शेरकी, विद्यार्थी अध्यक्ष परब गिरडकर , समीर खान, प्रवीण आरेपल्लीवार ,,लता जांभुळकर, शोभाताई घरडे सरस्वती गावंडे बापट नगर वार्डातील महिला नागरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.